विदर्भ

वाशिम : शिवसेना ठाकरे गटाच्या वाशिम महिला शहर प्रमुखावर खुनी हल्ला

अमृता चौगुले

वाशिम; पुढारी ऑनलाईन : वाशिम शिवसेना महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर एका अज्ञात युवकाने चाकूने त्यांच्या अंगावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.१०) भरदिवसा स्थानिक ग्रामीण पोलीस स्थानकासमोर घडली. पौळकर यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला झाला आहे. शहरातील ग्रामीण पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भर रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या आपल्या मैत्रिणीसह बाजारात जात असताना ही घटना घडली. पौळकर यांच्यावर चाकूने दहा ते पंधरा वेळा वार करण्यात आले असून या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT