विदर्भ

वाशिम : पालकमंत्री संजय राठोड गुरूवारी पोहरादेवीत

दिनेश चोरगे

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उद्या गुरूवारी (दि.१०) जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. संजय राठोड सकाळी ८ वाजता यवतमाळ येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने तिर्थक्षेत्र पोहरादेवीकडे जातील. सकाळी ९.३० वाजता श्री तिर्थक्षेत्र पोहरादेवीचे दर्शन घेतील. सकाळी ९.५० वाजता तिर्थक्षेत्र उमरीकडे त्यांचा पुढील कार्यक्रम असेल.  १०.१० वाजता तिर्थक्षेत्र उमरी येथे आगमन व मंदिर दर्शन घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी जातील.

सकाळी १०.३० वाजता सामकीमाता मंदिर परिसर येथे उमरी-पोहरादेवी परिसरातील तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांच्या पायाभरणी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. सकाळी ११.४५ वाजता ते  पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमकडे जाणार आहेत. संजय राठोड दुपारी १२.०५ वाजता नंगारा म्युझियम पोहरादेवी येथे तिर्थक्षेत्र पोहरादेवी-उमरी विकास आराखडयातील विकास कामांबाबत यंत्रणांचा आढावा घेतील. दुपारी १ वाजता पोहरादेवी येथून मानोरामार्गे नेरकडे जातील.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT