मुलाने केला बापाचा खून  File Photo
गोंदिया

गोंदिया : रागाच्या भरात पोटच्या मुलाने केला बापाचा खून

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खैरबोडी गावात एका मुलाने आपल्या दारुड्या बापाचा खून केला. ही घटना रविवारी (दि.२९) पहाटे १.३० च्या सुमारास घडली. रमेश पारधी (वय ५०, रा. खैरबोडी) असे मृत पित्याचे नाव असून आनंद पारधी (वय २४) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मृत रमेश आणि त्याची पत्नी चंद्रकला पारधी व दोन मुले आनंद आणि अंकुश यांच्यासह खैरबोडी येथे राहतात. रमेशला दारूचे व्यसन होते. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत तो नेहमी पत्नी चंद्रकला आणि मुलगा आनंद यांच्याशी वाद घालायचा. शनिवारी रात्री रमेशचा चंद्रकलासोबत वाद झाला आणि चंद्रकला घराबाहेर पडली. यावेळी त्यांचा मोठा मुलगा आनंद घराबाहेर गेला होता. दरम्यान, रात्री ९.३० च्या सुमारास रमेश पुन्हा मद्यप्राशन करून घरी आला. यावेळी लहान मुलगा अंकुश घरात असताना रमेशने अंकुशला 'तुझी आई कुठे आहे' असे विचारले व शिवीगाळ करून घरातून निघून गेला. यानंतर रात्री ११.३० वाजता रमेश पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी परत आला आणि अंकुशसोबत वाद घालू लागला. काही वेळाने आनंदही घरात आला. त्यानंतर मृत रमेश आणि आरोपी आनंद यांच्यात वाद सुरू झाला.

यावेळी दोघानी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत आरोपी मुलगा आनंद याने वडिलांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या घटनेत रमेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन रमेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृताच्या पत्नीने कुटुंबीय व शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय कवडे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT