EX armyman brutally killed In Balgavade
बलगवडे येथील माजी सैनिकाचा निर्घृण खूनPudhari File Photo

बलगवडे येथील माजी सैनिकाचा निर्घृण खून

डोर्ली फाटा येथील घटना; मृताची कार घेऊन संशयित पसार
Published on

मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा

बलगवडे (ता. तासगाव) येथील माजी सैनिक गणपतराव धोंडिराम शिंदे (वय 65) यांचा राहत्या घरी बुधवारी रात्री लोखंडी रॉडने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. संशयिताने शिंदे यांची कार घेऊन पलायन केल्याची चर्चा आहे. दरम्यान, रात्री उशिरा गावातील एका संशयिताला धाराशिव येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

EX armyman brutally killed In Balgavade
Murder Case | खून कारवारात, संशयिताचा मृतदेह गोव्यात

शिंदे बलगवडेचे रहिवासी होते. ते तासगाव महामार्गालगत नवी डोर्ली बसस्थानकाशेजारील शेतात बांधलेल्या घरात एकटेच राहत होते. गुरुवारी सकाळी फिरायला येणार्‍या व्यक्तींना त्यांचे घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता, सर्वत्र रक्त सांडलेले दिसले. त्यांनी पोलिसांना कळवले. घरामध्ये मागील बाजूला असणार्‍या खोलीत कापडामध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर लोखंडी जाड रॉडने घाव घातल्याचे दिसून आले.

डोक्याला गंभीर जखम होती. बाहेरील खोलीत लोखंडी कॉटवर ते झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तेथून शिंदे यांना ओढत नेऊन मागील खोलीत कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. तेथून रॉड हस्तगत केला आहे. शिंदे यांच्या यांच्यामागे दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले उपस्थित होते. तासगावचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ तपास करीत आहेत.

EX armyman brutally killed In Balgavade
एरंडोलीत शस्त्राने वार करून तरुणाचा खून

खुनाचे कारण अस्पष्ट

शिंदे लष्करातून सुभेदार पदावरून पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा खून कोणी केला, तसेच खुनाचे कारण काय, याबाबत लगेचच माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, बुधवारी रात्री शिंदे व गावातील एक व्यक्ती यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. या वादाच्या घटनेचा त्यांच्या खुनाशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news