कंत्राटी अभियंत्याला ७ हजाराची लाच घेताना अटक केली.  Pudhari File Photo
गोंदिया

गोंदिया : ७ हजाराची लाच घेताना कंत्राटी अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंत्याला ७ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने गुरूवारी (दि. १२) रंगेहाथ अटक केली. अनिल धर्मराज मेश्राम असे या लाचखोर कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे.

राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत २०२३-२४ या कालावधीत ग्रामपंचायत मोरगाव येथील लाभार्थ्याला घरकुल मंजूर होवून १लाख ३१ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. मंजूर झालेल्या घरकुलाची प्रशासकीय मंजुरी घेऊन लाभार्थ्यांनी बांधकाम केले. दरम्यान, लाभार्थ्याने शेवटच्या देयकाची मागणी केली. मात्र, कंत्राटी अभियंता धर्मराज मेश्राम याने देयकाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या नावावर लाभार्थ्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाभार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरूवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला व कंत्राटी अभियंत्याला तडजोडीअंती लाभार्थ्याकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT