टोपमधील भूमी अभिलेख अधिकारी, पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई
Anti-corruption department team took action
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाईPudhari File Photo
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी : टोप येथील नगर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी तुषार महादेव सोनवणे (45, रा. बामणोली जि. सांगली) आणि खासगी पंंटर अमर विक्रम चौगुले (42, रा. हातकणंगले) या दोघांना नागाव (ता. हातकणंगले) येथे चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

वारसा हक्क नोंदणीसाठी आठ हजारांची मागणी

याबाबतची माहिती अशी, अंबप (ता. हातकणंगले) येथील एका नागरिकाने वारसा हक्क नोंदणी करण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी सोनवणे याने आठ हजारांची मागणी केली होती. चर्चेअंती 4 हजारावर तडजोड झाली. दरम्यान, संबंधित व्यक्तीने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार सापळा लावला. एका जमिनीची मोजणी करण्यासाठी सोनवणे नागावमध्ये आला होता. तक्रारदारास नागाव येथे पैसे घेऊन बोलविले आणि त्या ठिकाणी लाचेची रक्कम स्वीकारताना सापडला. या कारवाईमुळे नागावसह परिसरात खळबळ माजली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू साळुंखे यांच्या पथकाने केली. पथकात सहायक फौजदार प्रकाश भंडारे, सुनील मोरे, हवालदार विकास माने, सुनील घोसाळकर व सुधीर पाटील यांचा समावेश होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news