विदर्भ

गोंदिया : कारमध्ये आढळली २ कोटींची रोकड

अविनाश सुतार

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा: कोहमारा वरुण रायपूरकडे जाणाऱ्या (CG08 R 9000) या क्रमांकाच्या कारमध्ये १ कोटी ९० लाख ४३ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपूर, बांध गावानजीक उघडकीस आली.

या प्रकरणी ३ जणांना देवरी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम नक्षलवाद्यांना फंड रुपात दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवरी पोलिसांच्या समयसुचकतेने नक्षलवादयांची ही आर्थिक रसद तुटली आहे. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपांना हमीपत्रावर सोडून दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT