दुचाकींची समोरासमोर धडक File Photo
गडचिरोली

गडचिरोली : दुचाकींची समोरासमोर धडक; एका मृत्यू, दोघे गंभीर

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : कोरची तालुक्यातील बेतकाठी-बोटेकसा मार्गावरील अल्लीटोला गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रामप्रसाद सदाराम ताराम (३८, रा. ढोलडोंगरी, ता. कोरची) असे मृताचे नाव आहे.

देवरी तालुक्यातील माहका या गावी आपल्या सासऱ्यांना दुचाकींने सोडून ढोलडोंगरी गावाकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने अल्लीटोला येथून संदीप कुंभरे (वय २९) व सहदेव काटेंगे (वय २३) हे आपल्या दुचाकीने बोटेकसा येथे आठवडी बाजाराकडे होते. यादरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रामप्रसाद ताराम यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप कुंभरे व सहदेव काटेंगे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रात्री गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनेचा तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT