छ.संभाजीनगर : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

घाणेगाव येथील घटना
 lake drowning Death
तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
Published on
Updated on

वाळूज महानगर :  मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१७) सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे (२१ नर्सरी कॉलनी, रांजणगाव ता. गंगापूर जि. छञपती संभाजीनगर ) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 lake drowning Death
सावधान! जगासमोर आता सुपरबग्जचे संकट; २५ वर्षांत होतील ४ कोटी मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, रांजणगाव येथील अभय गावंडे, कुणाल कापसे, रूपेश कंधारकर, रजनीकांत कापसे असे चौघेजण मंगळवारी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी घाणेगाव येथील तलावाजवळ गेले होते. चौघेजण गणपती घेवून तलावात उतरले यावेळी अभय हा पुढे होता. अभयला तलावातील खोलगट पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. दरम्यान याठिकाणी बंदोबस्त कामी तैनात असलेले पोलिस उपनिरिक्षक प्रभाकर जायभाये, पोलीस अंमलदार बनकर यांनी तात्काळ घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळवली. मनपा तसेच एमआयडीसी अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवून अभयला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 lake drowning Death
आखाड्यावर झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्यांवर हल्ला; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news