Many brothers in police custody in connection with the murder
खून प्रकरणPudhari File Photo

नागेश कराळे खून प्रकरण : मुख्य संशयिताचा कारागृहात मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Published on

संपूर्ण खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील पहिलवान नागेश कराळे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. योगेश बाजीराव दौंडकर (वय 40, मूळ रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. योगेश दौंडकरचा अंत्यविधी शेलपिंपळगाव येथे करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी बुधवारी (दि. 18) कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

दोन पिस्तुलातून दहा ते बारा गोळ्या झाडून खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील पहिलवान नागेश कराळे यांचा 23 डिसेंबर 2021 रोजी निर्घृण खून झाल्याने तालुकाभर एकाच खळबळ उडाली होती . याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर (वय 40, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड), लक्ष्मण बाबुराव धोत्रे (वय 34, रा. शेलपिंपळगाव), ओंकार भालचंद्र भिंगारे (वय 22, रा. उरावडे, ता. मुळशी,) फिरोज ऊर्फ समीर कचरू सैयद (वय 24, रा. कासुर्डी, ता. दौंड), शिवशांत शिवराम गायकवाड (वय 45, रा. शेलपिंपळगाव,) व सोपान नामदेव दौंडकर (वय 50, रा. शेलपिंपळगाव)

या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेतील गुन्हेगार हे संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) लावण्यात आला होता, तेव्हापासून ते कारागृहात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news