Death News  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Student Death | शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपविले

कुरखेडा तालुक्यातील कोनसरी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Kurkheda Government Ashram School Incident

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सोमवारी (दि.१२) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रानू कृष्णा हलामी (वय १४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळची कुरखेडा तालुक्यातील मोहगाव येथील रहिवासी असलेली रानू ही सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून आठव्या वर्गात शिकत होती. तिच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. मात्र, रानूला खोकला झाला होता. त्यामुळे ती आज शाळेत न जाता वसतिगृहातच होती. 

गावी जाण्यासाठी तिने आजच आपल्या आई-वडिलांना भेटायला बोलावले होते. तिने घरी जाण्याची विनंती केली. परंतु नियमानुसार तिला सुटी देता येत नाही, शिवाय पुढे परीक्षा आहे, असे वसतिगृह अधीक्षिकेने सांगितल्यानंतर रानूचे आई-वडील गावाकडे गेले. त्यानंतर रानू वसतिगृहाच्या वरच्या माळ्यावरील खोलीत गेली आणि तिने पंख्याला गळफास लावून जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.  

कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

१० ऑगस्ट रोजी धानोरा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी अजूनही नागपुरात मृत्यूशी झुंज देत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता सोनसरीच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने जीवन संपविल्याने खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT