Gadchiroli News : पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्टिंग

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाची तातडीची कार्यवाही
Gadchiroli News : पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्टिंग
Published on: 
Updated on: 

Gadchiroli News Gadchiroli News : Airlifting of three critical patients from flood affected areas

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा भामरागड तालुक्यातील पूरग्रस्त आणि दुर्गम भागात अडकलेल्या तीन गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ही तातडीची मदतकार्य मोहीम राबविली.

Gadchiroli News : पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्टिंग
Gambling Den : पोलादपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १२ लाख ४ हजारांचा ऐवज जप्त

बिनागुंडा येथून काल लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या सात वर्षीय संगीता चुक्कू उसेंडी हिला आज लाहेरी येथून हेलिकॉप्टरद्वारे हेडरी येथील लॉयड्स मेटल्स लिमिटेड कंपनीच्या मॉ काली अम्मल रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी हेडरी येथे हलविण्यात आले. यापैकी एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याची माहिती आहे.

वैद्यकीय सेवेसाठी या भागात उपलब्ध असलेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांच्या स्थलांतरासाठी आवश्यक नियोजन व समन्वय केला.

Gadchiroli News : पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्टिंग
Mahad MIDC Water Pollution: रासायनिक प्रदूषणाने टेमघर नाल्यात मृत माशांचा खच

रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हेही होते. प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे पूरस्थितीत अडकलेल्या तीनही गंभीर रुग्णांना वेळेत पुढील वैद्यकीय उपचारांसाठी हेडरी येथे पोहोचविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news