Gadchiroli Flying Drone Without Permission Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime | जमीन अधिग्रहण सर्वेक्षणाच्या नावाखाली विनापरवानगीने ड्रोन उडवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथे विनापरवानगीने ड्रोन उडवणाऱ्या तीन जणांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Flying Drone Without Permission

गडचिरोली : जमीन अधिग्रहण करण्यासाठी सर्वेक्षणाच्या नावाखाली चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथे विनापरवानगीने ड्रोन उडवणाऱ्या तीन जणांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवम कडोळे, सचिन विश्वकर्मा व प्रवीण पोटवार अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी(ता.९) दुपारनंतर मुधोली चक येथे तिघे जण गेले. ते ड्रोन उडवताना दिसताच गावकऱ्यांनी त्यांना विचारपूस केली. तेव्हा सर्वेक्षण करीत असल्याचे सांगताच संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव करुन ड्रोन कॅमेरे जप्त केले.

शिवाय तिघांना डांबूनही ठेवले. हे सर्वेक्षण वरद फेरो या स्ट्रील कंपनीसाठी करण्यात येत असल्याचा संशय होता. जमीन अधिग्रहणास स्थगिती असतानाही विश्वासात न घेता सर्वेक्षण केले जात असल्याने गावकरी संतप्त झाले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आम्ही तिघांना सोडणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

त्यानंतर संध्याकाळी चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घारुडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षक रात्री गावात दाखल झाले. 'नो फ्लाईंग झोन' मध्ये विनापरवानगीने ड्रोन उडवले जात असल्याचे चौकशीअंती निष्पन्न होताच तिघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

दरम्यान जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी चामोर्शी परिसरात भूमी अधिग्रहाणास दोन महिन्यांकरिता स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे कुठलेही सर्वेक्षण होणार नाही आणि नागरिकांनीही कायदा हातात घेऊ नये, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT