Gadchiroli Four Lane Bypass |गडचिरोलीला मोठी भेट! २३ किमीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित

प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला
Gadchiroli Proposed Bypass Road
Gadchiroli Proposed Bypass RoadAI photo
Published on
Updated on

Gadchiroli Proposed Bypass Road

गडचिरोली : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि जड वाहतुकीच्या वाढत्या ताणावर उपाय म्हणून गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी (फोर-लेन) बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे नेला जात आहे.

या प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीत अंतिम अलाइनमेंटवर चर्चा करून काही किरकोळ सुधारणा सुचविण्यात आल्या. तसेच प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Gadchiroli Proposed Bypass Road
Gadchiroli News : रानटी हत्तीच्या हल्ल्यात एक जण ठार

प्रस्तावित बायपास शहरापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर उभारला जाणार असून पुढील २५ ते ३० वर्षांतील वाहतुकीचा विचार करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा बायपास पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अर्चना मेंढे आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news