विदर्भ

गडचिरोली : कृषिपंपधारकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको

अविनाश सुतार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : कुरखेडा तालुक्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.२६) गेवर्धा फाट्यावर दीड तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष जीवन नाट आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या आंदोलनात गेवर्धा, चिखली, वडेगाव व गुरुनोली परिसरातील कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT