विदर्भ

नागपूर : सहलीचा आनंद बेतला जीवावर; चौघांचा बुडून मृत्यू

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी- वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्र- मैत्रिणीचा कन्हान नदी पात्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला. खोल डोहात बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये विजय ठाकरे (वय १८ रा.नारा), अंकुश बघेल ( १७, रा.कामठी), अर्पीत पहाळे,( १८) रा.कामठी, सोनिया म्हरस्कोल्हे ( १७) रा. नारा नागपूर यांचा समावेश आहे. या चौघासह साक्षी कनोजीया (१८, रा. पाटणकर चौक) व मुस्कान राणा, (वय १८, रा. जरीपटका) नागपूर असे एकंदर सहा जण वाकी येथे सहलीसाठी गेले होते.

वरील चौघांनी ताजुद्दीन बाबा दरबारचे दर्शन करुन त्यांनी परिसरातल्या कन्हान नदीच्या परिसरात फिरायला जाण्याचे ठरवले. सहा जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह झाल्याने ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात ते बुडू लागले. दरम्यान, सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुणालाही वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा व हितज्योती आधार फाउंडेशनची टीम घटनास्थळी पोहोचले. अंधार झाल्याने मृतदेहाचे शोधकार्य थांबविण्यात आले.

तरुणाईचे फलकाकडे होतेय दुर्लक्ष

वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगट डोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्या ठिकाणी पोहण्यास सक्त मनाई आहे. माहिती देणारे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, या तरुणांनी नेहमीप्रमाणे फलकाकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT