विदर्भ

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले; उध्दव ठाकरेंना मान्य आहे का? – बावनकुळे

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले हे उद्धव ठाकरे यांना आता मान्य आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाच सवाल सभेतून उपस्थित केला होता.

मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या नावावर राजकारण सुरू आहे. काही जिल्ह्यात तर दंगली सुद्धा घडल्या तरी देखील आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला फुले वाहिली. उध्दव ठाकरे आणि आंबेडकर यांची युती आहे आता ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एकंदरीत भाजपतर्फे पुन्हा एकदा औरंगजेब मुद्यावर ठाकरे यांना कोंडीत पकडत असल्याचे म्हटल्यास वावग ठरणार नाही, असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.,

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT