विदर्भ

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीच्या फुटीवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नवे समीकरण आणि शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची ५ जुलैला मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी नागपुरातून कोण जाणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra NCP Crisis)

शरद पवार (Maharashtra NCP Crisis)  यांनी ५ तारखेला बोलावलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी मंगळवारी (दि. ४) बैठक आयोजित केली आहे. सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार समर्थक यांच्या बैठकीत विदर्भातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

आज शरद पवार यांच्यासोबत ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अर्थातच या बैठकीसाठी मुंबईला कोण जाणार नागपूर येथील बैठकीत कोण- कोण उपस्थित राहणार यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा प्रवास अवलंबून आहे. तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार समर्थकांनी शहर कार्यालयावर आपला वरचष्मा असल्याचे सांगितले आहे. छगन भुजबळ समर्थक राष्ट्रवादी प्रदेश ओबीसी विभागाचे माजी अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी ओबीसी विभागासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावा 'पुढारी' शी बोलताना केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT