Chandrapur Fossil Discovery  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Fossil | जागतिक वारसा दिन : चंद्रपूर तालुक्यात धानोराजवळ अतिशय दुर्मिळ जीवाश्मे सापडली

World Heritage Day | बायसन, हरिन, काही मानवाचे, अश्मयुगीन अवजारे सुद्धा आढळली

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Fossil Discovery

चंद्रपूर : मागील वर्षापासून आतापर्यंत भूशास्त्र आणि पुरातत्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी संशोधन केले असता त्यांना वर्धा नदीच्या किनारी  धानोरा, भोयेगाव पुलाजवळ  महाराष्ट्रात प्रथमताच बायसन, हरिण, डुक्कर आणि मानवी अल्प जीवाश्मे तसेच सोबत पाषाण युगीन अवजारे सापडली आहेत. ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टेसीन काळातील २०,००० वर्षे दरम्यान ची अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची महत्वाची माहिती प्रा. चोपणे यांनी  दिली आहे.

आजपर्यंत भूशास्त्र विभागाला सुद्धा अशी जीवाश्म महाराष्ट्रात आढळली नसून ती केवळ प्रा. चोपणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शोधून काढली आहेत. नदीजवळ आढळलेल्या प्राण्यात जास्त प्रमाणात बायसन जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात वाईल्ड बोअर चे दात, हरिणाचे हाड, मानवाच्या पाषाण युगीन अवजारांसोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडे मिळाली असून ती चोपणे रॉक म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवली आहेत.

पाषाण युगीन मानव आणि वन्यजीवांचा संबंध

पाषाण युगीन मानवांची अवजारे सुद्धा ह्या अलीकडील प्राण्यांच्या जवळच आढळली असून मानव त्यांची शिकार करीत होते हे सिद्ध होते.२०,००० वर्षा दरम्यान जगात हिमयुग होते, त्यानंतर ते तापमाना मुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. ह्याच महापुरात विदर्भ आणि चंद्रपूर मधील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले. काही हजार वर्षानंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले.

वर्धा नदीच्या वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात आणि याच ठिकाणी चोपणे यांना हत्ती आणि इतर प्राण्यांची जीवाश्मे सापडली आहेत. भूशास्त्र विभागाला अजूनही असे जीवाष्मे चंद्रपूर जिल्ह्यात आढळली नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्राण्यांची जीवाश्म सापडली

चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्राच्या आणि जीवाश्माच्या बाबतीत देशात ,महाराष्ट्रात सर्वाधिक महत्वाचा जिल्हा आणि भूशास्त्रीय संग्रहालय मानल्या जात जाते. इथे प्रा. चोपणे यांनी महत्त्वाची जीवाश्म शोधली. त्यात २०० कोटी ते २०,००० हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म आढळते. ह्यातील १५० कोट्यावधी वर्षाचे स्ट्रोमॅटोलाईट,२० कोटी वर्षाचे वृक्ष आणि पानांचे  जीवाश्म,६ कोटी वर्षाची डायनासोर, वृक्ष, शंख - शिंपले आणि अगदी अलीकडील २०,००० वर्षाच्या हत्ती चे जीवाश्म आहेत.

  अलीकडील प्राण्यांचे जीवाश्म भारतात क्वचितच आढळली आहेत. देशात प्रथमतःच अशी जीवाश्म चंद्रपूर शहराजवळ सापडली परंतु शासकीय संग्रहालयाची अत्यंत गरज असल्याची आवाहन प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

प्रा. सुरेश चोपणे यांची विविध संशोधने

प्रा. सुरेश चोपणे हे १९९५ पासून भूशास्त्रीय संशोधन करीत आहेत. यांना चार वर्षांपूर्वी चंद्रपूर आणि वणी येथे पृथ्वीवरील १५० कोटी वर्षा पूर्वीचे पहिले स्त्रोमाटोलाइट हे जीवाश्म शोधून काढले.२५ वर्षापूर्वी पूर्वी ६ कोटी वर्षाची डायनासोर, शंख  शिंपले,१५ कोटी वर्षा दरम्यान ची वृक्ष,पाने शोधून काढली.तर शंख शिंपले आणि विविध जीवाश्म स्थळे शोधून काढली आहेत.

मागील आणि या वर्षी चोपणे यांना विविध प्राण्यांची बायसन, म्हशी, डुक्कर, हरिण आणि इतर अनोळखी प्राण्यांची जीवाश्म त्यांच्या संग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. असे प्राणी सापडणे हे चंद्रपूर साठी खूप महत्वाचे मानले जाते. कारण ही नवीन जीवाश्म भूशास्त्र विभागाला सुद्धा सापडली नाही. सर्व अभ्यासक, विद्यार्थी यांनी अशा प्राचीन जीवाश्मांना निश्चित पाहिले पाहिजे, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासकीय संग्रहालय स्थापन झाले पाहिजे, असा प्रयत्न न झाल्याने प्रा. चोपणे यांनी विसापूर येथे बोटनीकल गार्डन मध्ये स्वतःच्या प्रयत्नाने भौगोलिक संग्रहालय करण्यास मदत केली आहे, असे  प्रा. चोपणे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT