चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या छोट्याशा गावात आज मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गोरखपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झालेल्या अनुराग अनिल बोरकर (वय १९) याने आदल्या दिवशीच गळफासाने जीवन संपवले. त्या घटनमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेने समाजमनाला धक्का बसला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव निवासी व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग अनिल बोरकर याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा (NEET) उत्तीर्ण होऊन दुसऱ्या फेरीत गोरखपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. वैद्यकीय शिक्षणासाठी तो आज मंगळवारी गोरखपूरला रवाना होणार होता. परंतू त्याच्या आयुष्यातील ही सर्वांत महत्त्वाची वाटचाल सुरू होण्यापूर्वीच आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास अनुरागने स्वतःच्या खोलीत सिलींग फॅनला गळफास लावून घेतला.
पहाटे त्याची आई त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत बघून धक्काच बसला. तत्काळ तिने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. ही माहिती गावात पसरली. अनुराग हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या मृत्यूमुळे आई-वडील व बहिणी, आजीआजोबा असा आप्त परिवार असून त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण गाव दुःखात बुडाले असून अंत्यसंस्कार नवरगाव स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.