चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तुकुम भागात आज सोमवारी (2 जून) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात २२ वर्षीय सानिका कुमरे या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. तर काजल आत्राम ही मुलगी व अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भिषण अपघातात ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. यामुळे परिसरात काही वेळासाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली.
तुकुम हा चंद्रपूर शहरातील अत्यंत गजबजलेला आणि गर्दीचा परिसर आहे, जिथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. आज सोमवारी ट्रक या परिसरातून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट दुकानात जाऊन धडकला. यावेळी काही महिला व मुली रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या त्यांना चिरडत हायवा ट्र्क पुढे गेला. यामध्ये २२ वर्षीय सानिका कुमरे मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर काजल आत्राम रा. उपरवाही राजुरा व ५५ वर्षीय नंदा उंबरकर ह्य दोघी गंभीर जखमी झाल्या. काजल आत्राम ला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर अपघातात ६ दुचाकी व २ ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहन चालक विनोद दिवाकर माधुरे याला फिट आली आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार हे घटनास्थळी दाखल झाले. आणि अपघातग्रस्तांना रूग्णालयात पाठविले. खाजगी रुग्णालयात भरती केलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना ही घटना घडली आहे. घटनेचा तपास दुर्गापूर पोलीस करीत असून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.