Chandrpur Untreated alcohol
चंद्रपूर : दुर्गाडीत आमदारांनी पकडून दिली अवैद्य दारूPudhari Photo

Chandrpur Illegal alcohol | चंद्रपूर : दुर्गाडीत आमदारांनी पकडून दिली अवैद्य दारू

ग्रामस्थांच्या तक्रारीवर राजूराचे आमदार देवराव भोंगळेंची तत्काळ ऍक्शन
Published on

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्यानंतर राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी तत्काळ कारवाई केली.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी फाट्यालगत राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. या माहितीची गंभीर दखल घेत आमदार भोंगळे यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी धडक देत त्यांनी कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दोन पेट्या अवैध देशी दारू जप्त केली.

Chandrpur Untreated alcohol
Beed Crime News | अवैध दारू वाहतुकीला विरोध केल्याने अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न

ही कारवाई ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आमदार भोंगळे यांनी, पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देवून यापुढे अवैध विक्री आढळल्यास त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आमदारांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Chandrpur Untreated alcohol
राज्य उत्पादन शुल्क कोमात, अवैध दारू विक्री जोमात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news