Chandrapur theft 
चंद्रपूर

Chandrapur theft : कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास

महिना भरात घडलेल्या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील HDFC बँकेसमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी घडली.

माजरी येथील प्रॉपर्टी डीलर निलेश नत्थूजी भेले हे बँकेच्या कामासाठी वरोरा येथे आले होते. त्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग कारमध्ये ठेवली होती. ते बँकेत गेले असताना चोरट्यांनी कारची काच फोडून रोकड असलेली बॅग पळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात व्यक्ती बॅग घेऊन जाताना दिसून आल्या. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, महिनाभरापूर्वी व्यावसायिक सुधाकर रोहनकर यांच्या कारमधूनही अशाच पद्धतीने सुमारे ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT