Chandrapur Theft | खांबाडा उपबाजारातील गोदाम फोडून सरकीची ८० पोती चोरीला; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

वारोरा पोलिस ठाण्यात तक्रार
Khambada Cottonseed Theft
Khambada Cottonseed Theft AI Photo
Published on
Updated on

Khambada Cottonseed Theft

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील  खांबाडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारातील गोदामातून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात सरकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे १.७७ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी पळविला असून, २४ तास खासगी सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी झाल्याने सुरक्षेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येनसा शिवारातील नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या श्री बालाजी अग्रो इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग युनिटच्या वतीने खांबाडा उपबाजारातील गोदामातला सरकी चा साठा ठेवण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांनी गोदामातून ५० किलो वजनाची तब्बल ८० पोती सरकी चोरून नेली.

Khambada Cottonseed Theft
Chandrapur Congress Politics | गटनेता बदलासाठी काँग्रेस नगरसेवकांचे पर्यटन; धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुन्हा पेटला

बाजारभावानुसार चोरीस गेलेल्या सरकीची किंमत अंदाजे १ लाख ७७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालाची चोरी होऊनही सुरक्षा रक्षकांना याची माहिती न मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी वारोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news