चंद्रपूर

चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

अविनाश सुतार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.१७) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मार्गेश्वर किशोर मेश्राम (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ६ ऑगस्ट २०२१ रोजी पोलीस स्टेशन मुल हद्दीतील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपीने जबरीने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपीविरुध्द मूल पोलीस स्टेशनमध्ये बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी केला. आरोपी विरूध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. विशेष सत्र न्यायाधीश अनुराग दिक्षीत यांनी आरोपी मार्गेश्वर किशोर मेश्राम (वय २३) यास जन्मठेप व ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास १२ महीने कारावास अशी शिक्षा सुनावली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन महिला पोलीस परवीन यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT