चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची झुंज | पुढारी

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची झुंज

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काल सोमवारी सकाळी बेलारा बफरझोनमध्ये दोन वाघांची पर्यटकांची झुंज पहायला मिळाली. बराचवेळ झुंज झाल्यानंतर दोन्ही वाघ शांत झाल्याने झुंजीतील अनर्थ टळले. मात्र सोमवारी (दि. १३) पर्यटकांकरिता सफारी वाघांच्या झूंजीने मेजवाणी देणारा ठरला.

देशातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. सोमवारी (दि. १३) सकाळच्या सफारीकरीता पर्यटकांचे आगमण झाल्यानंतर बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांची झूंज पर्यटकांना पहायला मिळाली. मोठ मोठ्याने डरकाळ्या फोडत ते दोन्ही वाघ एकमेका विरोधात भिडले. बराचवेळ एकमेकांच्या अंगावर धावून धावून जात वाघांची झुंज पर्यटकांना पहायला मिळाली. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते. ताडोबातील ही दुर्मिळ घटना पर्यटकांना “याची देही याची डोळा” अनुभवता आली. दशकापासून या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ या व्याघ्रप्रकल्पात आहे. देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांचा ओढा या व्याघ्रप्रकल्पाकडे आहे. अशातच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांची झुंजीची घटना काल सोमवारी घडल्याने आणि घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ताडोबा पुन्हा चर्चेत आला आहे. वाघांच्या झुंजीचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शविली आहे. मात्र दोन्ही वाघाच्या कडवी झुंजीतून वाघांच्या मृत्यूमुखी होण्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. या घटनेत अनर्थ टळला आहे.

Back to top button