Chandrapur Municipal Polls Candidates Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Municipal Election | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ५६५ नामनिर्देशन पत्र दाखल

छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी त्वरित प्रसिद्ध केली जाणार

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Municipal Polls Candidates

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (३० डिसेंबर) संपूर्ण ५६५ उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत सादर केले आहेत. शहरात निवडणूक प्रक्रियेला जोरदार प्रतिसाद मिळत असून विविध पक्ष आणि स्वतंत्र उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल झाले आहेत.

५ कार्यालयांमध्ये ५६५ अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ५ कार्यालयांमध्ये अर्ज मागील मुदतीत वेळेत दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी काल मंगळवारी एकूण ५६५ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत. यापैकी ५५२ अर्ज सोमवारी प्रत्यक्ष दाखल झाले असून उर्वरित अर्ज काल मंगळवारी दाखल करण्यात आले.  या प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी त्वरित प्रसिद्ध केली जाणार आहे.

छाननी नंतर इच्छुक उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस २ जानेवारी २०२६ (शुक्रवार) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आहे. तसेच निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया ३ जानेवारी २०२६ (शनिवार) सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याच दिवशी अंतिमरित्या लढविणाऱ्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे.

अर्ज दाखल केंद्रनिहाय संख्यात्मक माहिती

नाव नोंदणीच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या अर्जांची विभागानुसार संख्या पुढीलप्रमाणे आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी 1 : प्रभाग क्रमांक 1,2,5 मध्ये 99 य अर्ज दाखल झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी 2 : प्रभाग क्रमांक 3,4,6 मध्ये 92 अर्ज दाखल करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी 3 : प्रभाग क्रमांक 7,8,9 मध्ये 82 अर्ज दाखल करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी 4 : प्रभाग क्रमांक 10,11,12,15, मध्ये 158 अर्ज दाखल करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी 5 : प्रभाग क्रमांक 13,14,16,17 मध्ये 134 अर्ज दाखल करण्यात आले.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण गतीने सुरू असून, आता पुढील टप्पा म्हणजे छाननी, चिन्ह वाटप आणि अंतिम यादी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या सहभागामुळे आगामी निवडणुकीत चांगलीच लढत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT