Chandrapur Warora Anganwadi Food Negligence 
चंद्रपूर

Chandrapur Warora Anganwadi Food Negligence|वरोरातील शेगाव बु. येथे अंगणवाडीच्या पोषण आहारात झाडूचा तुकडा; पालकांकडून संताप

वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे अंगणवाडीच्या पोषण आहारात झाडूचा तुकडा; पालकांकडून संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर - वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील इंदिरानगर अंगणवाडी क्रमांक ६ मधून वितरित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये झाडूचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव बु. येथील रहिवासी सचिन नरड यांना त्यांच्या मुलीसाठी इंदिरानगर अंगणवाडी क्रमांक ६ मधून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत (ICDS) 'मल्टिग्रेन न्यूट्री पफ' (Multigrain Nutri Puff) चे पॅकेट देण्यात आले होते. पॅकेट उघडल्यानंतर त्यातील खाद्यपदार्थांमध्ये झाडूचा तुकडा असल्याचे निदर्शनास आले.

पॅकेटवरील माहितीनुसार, हे २६० ग्रॅम वजनाचे पॅकेट (बॅच क्र. N.PUFF-B04-20) 'जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड' (Just Universal Private Limited), कामठी, जि. नागपूर यांच्यामार्फत उत्पादित व पॅक करण्यात आले आहे.

लहान मुलांच्या पोषण आहारात अशा प्रकारे अस्वच्छ व घातक वस्तू आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित उत्पादक कंपनी तसेच जबाबदार घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT