Hottest City In India
चंद्रपूर : राज्यातील सर्वच जिल्हे उष्णतेमुळे होरपळत आहेत, त्यामध्ये विदर्भातील सर्वच जिल्हे तापत आहेत. दोन दिवसांपासून चंद्रपूरला मागे टाकीत ब्रम्हपुरी भट्टीप्रमाणे तापले आहे. आज गुरूवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या तापमानात 0.3 अंशाने वाढ होऊन देशात सर्वात जास्त हॉट ठरले आहे. येथे 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर त्यापाठोपाठ अकोला 45.2 अंशाने दुसऱ्या स्थानी आहे. सतत दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचे तापमान वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ भट्टीप्रमाणे तापत असून नागरिक होरपळत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान वाढत आहे. रविवार 20 एप्रिल पासून चंद्रपूरने सर्वच जिल्ह्यांना मागे टाकीत तापमानात उच्चांकी घेतली. रविवारी 44.6 व सोमवारी 45.6 अंशाने देशात सर्वातजास्त तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारी ओरिसातील झारसगुडा येथील तापमानात वाढ झाली. चंद्रपूरला मागे टाकीत देशात सर्वात जास्त तापमानाची येथे नोंद करण्यात आली. बुधवारी चंद्रपूरच्या तापमानात 0.3 अंशाने घट झाली आहे. तर त्याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात 0.4 अंशाने वाढ 45.6 अंशाची नोंद करण्यात आली. काल झारसगुडाच्या तापमानात घट होऊन ब्रम्हपुरीचे तापमान वाढल्याने ते देशात उच्चांकी ठरले.
चंद्रपूर 45.0, ब्रम्हपुरी 45.9, अमरावती 44.2, अकोला 45.2, नागपूर 44.4, यवतमाळ 44.4, वर्धा 44.0, गडचिरोली 44.0, वाशिम 43.2, गोंदिया 42.6, भंडारा 42.4, बुलढाणा मध्ये 40.6 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी चंद्रपूरच्या तापमानात 0.5 अंशाने घट तर व ब्रम्हपुरी शहरातील तापमानात दुसऱ्या दिवशीही 0.3 अंशाने वाढ होऊन तापमान 45.9 अंशाने देशात हॉट ठरले आहे.