Latest
जळगाव भारतातील सर्वात हॉट शहर ! तापमान पाहून तुम्हालाही बसेल धक्का
पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात शुक्रवारी महाराष्ट्र हे सर्वात उष्ण राज्य ठरले. जळगाव (44.9) सलग तिसर्या दिवशी टॉपवर होते. त्यापाठोपाठ अकोला शहराचा पारा 44.5 अंशांवर गेला होता. शुक्रवारी राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान 43 ते 44 अंशांवर गेले होते. दिवसभर अंगाची काहिली करणारे ऊन असल्याने नागरिक हैराण झाले होते. उष्णतेची ही लाट 14 मेपर्यंत राहणार आहे.
शुक्रवारचे राज्याचे तापमान..
जळगाव 44.9, अकोला 44.5, अमरावती 42.6, ब्रम्हपुरी 41.2, गोंदिया 42.5, पुणे 40.8,
लोहगाव 40.6, कोल्हापूर 36.5, महाबळेश्वर 33.6, धाराशिव 41.1, छत्रपती संभाजीनगर 41.4, परभणी 42.8, बीड 42.
देशात सर्वाधिक तापलेली शहरे
जोधपूर-43.3
भूज-43.4
राजकोट-43.8

