चंद्रपूर : दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेवुन जाण्याचे शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. ही घटना मूल येथील पंचशील वार्ड क्रमांक ७ मध्ये घडली. चरण कामडे (१६) असे मृताचे नाव आहे. यामध्ये स्वप्निल सुभाष देशमुख, अविनाश चंद्रभान कामडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान शांत असलेल्या मूल शहरात बाहेरील व्यक्तींचा शिरकाव होत असुन गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे व आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.
मूल नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचशील वार्ड क्रमांक ७ मध्ये घरा जवळ कामडे चुलत भाऊ असलेले कुंटुब राहतात. घटनेच्यावेळी संशियत आरोपी नरेंद्र नामदेवराव कामडे आणि त्याची पत्नी मनीषा नरेंद्र कामडे असे मिळुन त्याचा चुलत भाऊ चरण कामडे यांचे सोबत दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेवुन जाण्याचे शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यावेळी मनीषा कामडे हिने चंद्रपूरला फोन करून काही गुंड प्रवृत्तीच्या लोंकाना बोलावून घेतले. त्या व्यक्तीकडे धारधार चाकू असल्याने कुठलाही विचार न करता बबन कामडे यांचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा मुलगा प्रेम हा वडिलांना सोडविण्यासाठी समोर आला असता त्यात तो गंभीर जखमी झाला व पोटामध्ये आतपर्यंत चाकू लागल्याने काही वेळातच त्याचा मृत्यु झाला.
या घटनेमध्ये संशयित आरोपी राजेश बंडु खनके (२६ रा. पठाणपुरा चंद्रपुर) सचिन बंडु खनके (२७ रा. पठाणपुरा चंद्रपुर), वैभव राजेश महागावकर (२३ पठाणपुरा चंद्रपुर) कपिल विजय गेडाम (२३ रा. पठाणपुरा चंद्रपुर) , श्रीकांत नारायण खनके (२८ रा. पठाणपुरा चंद्रपुर) नरेंद्र उर्फ नरेश नामदेव कामडे (४२, रा.मूल) यांना अटक करण्यात आली. तसेच मनिषा नरेंद्र कामडे (वय.२९ रा.मुल) हिला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन (क्र. एम.एच.३४ ए.ए.४४२४) ही जप्त करण्यात आली आहे. तर सर्व आरोंपीवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हाच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे चमार्गदर्शनात सपोनि अमितकुमार आत्राम करीत आहेत . मूल बंद दरम्यान सर्व दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.