

दौंड शहरालगत असलेल्या लिंगाळी गाव हद्दीमध्ये गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अमोल सुभाष साळुंखे( वय ३३, रा. लिंगाळी ता. दौंड) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला असल्याची घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार संतोष शिंदे यांनी सांगितले की हा खून नक्की कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दौंड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात लूटमार खून या घटना गेल्या पंधरा दिवसात वाढलेल्या आहेत.