विदर्भ

चंद्रपूर: दुचाकीच्या अपघातात पत्नी ठार; पती गंभीर जखमी

अविनाश सुतार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : एका दुचाकीची दुस-या दुचाकीला मागून जबर धडक लागून समोरील दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री ११ च्या सुमारास भद्रावती शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर राजमनी मंगल कार्यालयाजवळ घडली.

आशा गोवर्धन खडसे (वय ५२, रा. वेकोली, कुसना कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर गोवर्धन खडसे (वय ६२) असे गंभीर जखमी पतीचे नाव असून त्यांच्यावर नागपूर येथे खासगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. यातील धडक देणारा दुचाकी स्वार प्रज्वल कार्लेकर (वय २१, रा. श्रीनगर भद्रावती) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खडसे दाम्पत्य आपल्या (एमएच. ३४ ए. एल. २९७३) क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशन रोडने जात होते. यावेळी राजमनी मंगल कार्याजवळ मागून येणाऱ्या मोटरसायकल (क्रमांक एमएच. ३४ बी. यु.३४६१) ने जोरदार धडक दिल्ली. यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. आशा खडसे यांना रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. दुचाकीस्वार आरोपी प्रज्वल कार्लेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT