विदर्भ

चंद्रपूर : ताडोबात वाघ आणि बछड्याची मस्ती व्हायरल

backup backup

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि दोन बछड्याची मस्तीचा व्हिडिओ नुकताच समाजमाध्यमावर वायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज दिवसभर या व्हिडिओची चर्चा सूरु आहे. जगात प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देश व विदेशातील पर्यटक व्याघ्र दर्शनाकरिता येतात. विविध नावाने परिचित असलेले वाघ पर्यटकांना भूरळ घालतात. त्यामूळेच येथील वाघांची झलक पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.

ताडोबाच्या अलिझंझा बफर क्षेत्रातील एक वाघ व दोन बछड्यांची मस्ती सुरू असतानाचे दृश्य पर्यावरण प्रेमींना आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाघ आणि बछड्यांची मस्ती सुरू असताना तो क्षण कॅमेरा टिपला. आणि तो समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आला. दुर्मिळ स्वरूपाचा हा क्षण नेटकऱ्याच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या विवान करापूरकर आणि चालक प्रवीण बावणे यांनी टिपला आहे. हिरव्या हिरव्या निसर्गात बबली नावाची वाघिण आणि तिचे 2 बछड्यांनी मनमुराद मस्ती केली असल्याचे दिसत आहे. एकमेकांच्या खोड्या करत त्यांची ताडोबातील मस्ती समाजमाध्यमावरून पर्यटकांना पाहता येत आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT