विदर्भ

चंद्रपूर: चक्क आमदारांच्याच मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील घटना

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चोरटा चोरी करताना काळ, वेळ आणि स्थळ पाहत नाही. शिवाय माणूसही पाहत नाही. मग तो व्यक्ती कुणीही असो, व्हीआयपी असो किंवा सामान्य असो. त्याला वाटेल त्या व्यक्तींच्या वस्तू चोरून तो हातसाफ करतोच. अशीच एक चोरीची घटना चंद्रपूरच्या आमदारांसोबत घडली आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना त्यांचे दोन महागडे मोबाईल चार्जिंगला लावलेले असताना चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल शनिवारी उघडकीस आली आहे.

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे पंचायतराज कमिटीत असल्याने ते सोलापूर येथे दौ-यावर गेले होते. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचे गाव पंढरपूर होते. काल शनिवारी तेथील काम आटोपून ते कुरुडवाडी स्टेशवरून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये मुंबईसाठी बसले. रात्री झोपेची वेळ झाल्यानंतर त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावले. अन् पहाटे त्यांना जाग आली असता, दोन्ही फोन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच सहप्रवाशांच्या फोनवरून स्वतःचे नंबर डायल केले. पण तेव्हा दोन्ही मोबाईल फोन बंद आढळून आले. सिध्देश्वर एक्सप्रेस मधून त्यांचे दोन्ही महागडे मोबाईल चोरीला गेले. त्यांनी मुंबईत पोहोचल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली आणि रेल्वेमंत्र्यांनाही पत्र लिहून तक्रारीची घटना अवगत केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT