विदर्भ

चंद्रपूर : ब्रह्मपुरी परिसरात हत्तीचा कळप दाखल; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

निलेश पोतदार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा एक कळप दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वन्य हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी पंधरा ते वीस हत्तींचा कळप देसाईगंज (वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आला.

हत्तींचा कळप वैनगंगा नदी पात्र पार करून आला

असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्र पार करीत हत्तींचा कळप ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव खरकाडा निलज शेतशिवारात आला. बुधवारी (  दि.8 ) रात्री ८वाजण्याच्या सुमारास दाखल झाला असून, हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सध्या जंगलात खाद्य वनस्पती आणि पाणी मुबलक प्रमाणात असले तरी जंगलाच्या शेजारील शेती मध्ये धनाच पीक कापणीला आले आहे. हत्तीच हे आवडतं खाद्य आहे. त्यामुळे हे हत्ती शेतावर जाऊन धनाच नुकसान करू शकतात; पण या हत्‍तींच्या जवळ गेल्यास हे हत्ती शेतकऱ्यांवर किंवा गावातल्या लोकांवर हल्ला करू शकतात. त्‍यामुळे गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच गावातील लोकांना याबाबत दवंडी देऊन सभा घेऊन हत्तीं पासून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.

हत्तींच्या हालचालीकडे ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकारी, वन कर्मचारी गस्त घालत आहेत. पिंपळगाव खरकडा निलज परिसरात हत्तींचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT