चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर तालुक्यातील महादवाडी येथील जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. शामराव जुमनाके (वय ५०) असे त्याचे नाव आहे.
मुल चंद्रपूर महामार्गावरील महादवाडी गावाजवळच्या जंगलात शामराव हे काल जनावरे चारायला घेऊन गेले होते. दुपारच्या सुमारास जनावरे चारत असताना पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शामराव गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनाम केला.
परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वन विभाग मात्र वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पाऊले उचलत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :