विदर्भ

चंद्रपूर: ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न समितीवर काँग्रेसची सत्ता कायम

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत शेतकरी विकास पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजप प्रणीत शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ चार जागावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या आघाडीला मात्र भोपळाही फोडता आला नाही. आज (दि. २९) मतमोजणी झाली.

निवडून आलेले उमेदवार असे –

काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलमधून प्रभाकर सेलोकर हे बिनविरोध निवडून आले. सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटातून दिवाकर मातेरे, राजेश तलमले, अरूण अलोणे, प्रमोद मोटघरे, किशोर राऊत तर सहकार क्षेत्रातील महिला राखीव गटातून सुनिता तिडके व अजंली उरकुडे निवडून आले. व्यापारी गटातून प्रशांत उराडे, ग्रामपंचायत राखीव गटातून सोनू ऊर्फ प्रेमानंद मेश्राम, ज्ञानेश्वर झरकर, उमेश धोटे, संजय राऊत, आर्थिक दुर्बल गटातून ब्रम्हदेव दिघोरे निवडून आले.

तर भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलमधून सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटातून केशव भुते, किशोर बगमारे , व्यापारी गटातून यशवंत आंबोरकर, मापारी गटातून नरेंद्र ठाकरे निवडून आले. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यावेळी काँग्रेसने बाजी मारून सत्ता हातात ठेवली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT