चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वीज पडून गुराख्याचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वीज पडून गुराख्याचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  जनावरे चराईसाठी गेलेल्या एका गुराख्याचा शनिवारी (दि. २२) ५ वाजता वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी शिवारात घडली. नवलाजी बळीराम लडके(३५, रा. धानोलीपोहा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शनिवारी  ब्रम्हपुरी तालुक्यातील धानोलीपोहा (चक) निवासी नवलाजी बळीराम लडके हा गुराखी लगतच्या चौगाण मालडोंगरी परीसरात जनावरे चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास चौगाण मालडोंगरी रस्त्यालगत जनावरे चारत असताना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. म्हशीला परत आणत असताना नवलाजी लडके यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये  त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा एक लहान मुलगी असा परिवार आहे.

Back to top button