विदर्भ

चंद्रपूर: मालगाडीचा डबा रुळावरून घसरला; वाहतूक खोळंबली

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: बल्लारपूर (चंद्रपूर) दक्षिणकडून येणाऱ्या मालगाडीचा एक डबा बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रुळावरून खाली उतरल्यामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यामुळे दक्षिणकडून येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

चारचाकी वाहन वाहून नेणारी ही २५ कोचची मालगाडी (एफएनएनएमजी) दक्षिणकडून दिल्लीला जात होती. ती बल्लारशाह फलाट क्रमांक ५ च्या मागे रेल्वे यार्डमध्ये येताच पोल क्रमांक १२५९ जवळ रेल्वे इंजिनमागील डबा क्रमांक ९४४०२६ हा रुळावरून खाली उतरला. त्यामुळे मालगाडी जाग्यावरच थांबली. यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. लगेच या घटनेची माहिती बल्लारशाह रेल्वे प्रशासनाला देण्यात आली.

तात्काळ रेल्वेचे सर्व अधिकारी घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली. या घटनेमुळे दक्षिणकडून येणारी रेल्वे वाहतूक खोळंबली. सदर घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठांना देण्यात आली. हा मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरू होते. यात जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT