चंद्रपूर : घुग्घुस न्यू रेल्वे कोल साईडिंगच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह | पुढारी

चंद्रपूर : घुग्घुस न्यू रेल्वे कोल साईडिंगच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा घुग्घुस येथील वैकोली वाणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली. आज (मंगळवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

घुग्घुस येथील वैकोली वाणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामूळे रेल्वे प्रशसनात एकच खळबळ उडाली.

या घटनेबाबत घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आज (मंगळवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर येथील सीएसटीपीएस पॉवर हाऊस येथून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरच्या कचाट्यात येऊन या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूरचे सीएसटीपीएस ताडोबाच्या जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्य प्राणी या परिसरात वावरत असतात.

हेही वाचा : 

Back to top button