विदर्भ

वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना नुकतीच रिसोड शहरातील एका शाळेत घडली. शाळेतील शिक्षकाने एका ११ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिमच्या रिसोड शहरातील एका शाळेतील शिक्षक अनंतराव बाबाराव देशमुख (रा. कृष्णा भवन, रामनगर, रिसोड, जि. वाशीम) याने एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याबाबत मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबद्दल सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास रिसोड शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT