देऊळगाव राजा ः तालुक्यातील अंढेरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचे झालेले नुकसान  (छाया ः नंदकुमार देशमुख)
बुलढाणा

Buldhana weather : अंढेरा परिसराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा ः तालुक्यातील अंढेरा परिसरात 1 जून रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोलर प्लेटसह इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. अंढेरा येथील रविराज देशमुख यांच्या गट क्रमांक 324 मधील शेतात विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी जी.के. सोलर कंपनीचा सोलर पंप प्रकल्प उभारण्यात आला होता.

1 जून रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास अंढेरा व परिसरात अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. या वादळामुळे सोलर प्लेटचे लोखंडी स्ट्रक्चर वाकले असून सोलर प्लेट्स जमिनीवर कोसळून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या सोलर यंत्रणालाही फटका बसल्याची चर्चा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामा करण्यात यावा तसेच संबंधित सोलर कंपनी व शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे शेतीपूरक आधुनिक साधनेही धोक्यात येत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT