विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी दौऱ्याशी संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या  Pudhari
बुलढाणा

President of India Shegaon visit | राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी; पोलीस यंत्रणा सज्ज

Buldhana News | विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी केली स्थळ पाहणी

पुढारी वृत्तसेवा

President of India Shegaon visit

बुलढाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षा आणि नियोजनाच्या दृष्टीने व्यापक तयारी सुरू आहे. या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि.१७) दौऱ्याशी संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

२५ फेब्रूवारी रोजी शेगांव येथे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.त्यांच्या दौ-याच्या अनुषंगाने राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेची बहुस्तरीय तपासणी करण्यात येत आहे.

सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्यात आला. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता,सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व प्रोटोकॉल पालन याबाबत सविस्तर सूचना यावेळी देण्यात आल्या.

पोलीस महानिरीक्षक यांनी सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देत, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी समन्वयाने काम करण्याचे व राष्ट्रपतींचा दौरा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT