NQAS certification Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन’ मानांकन

मानांकनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित
Primary Health Centers Buldhana
Primary Health Centers BuldhanaPudhari
Published on
Updated on

Primary Health Centers Buldhana

बुलढाणा : आरोग्य सेवेतील गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.

यामध्ये बुलढाणा तालुक्यातील हतेडी, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, चिखली तालुक्यातील किन्होळा, मेहकर तालुक्यातील जानेफळ आणि खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या मानांकनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Primary Health Centers Buldhana
Buldhana News | आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन, बुलढाण्यात खळबळ

केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आढावा बैठकीत जिल्ह्याचा राष्ट्रीय मानांकनात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यपद्धती अवलंबून हे यश मिळवले.

डॉ. किरण पाटील तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुकास्तरावर नियमित आढावा बैठका घेण्यात आल्या. अधिकारी ते आशा सेविका अशा सर्व घटकांच्या समन्वयातून ही कामगिरी साध्य झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले.

Primary Health Centers Buldhana
Buldhana News |महिला रुग्णाच्या गर्भाशयातून काढला सहा किलो वजनाचा ट्युमरः जिल्हा महिला रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया!

राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी तीन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या निधीतून रुग्णांसाठी सुविधा वाढविणे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news