Buldhana Police Arrest Interstate Gang Pudhari
बुलढाणा

Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर दरोडा: आंतरराज्यीय टोळी जेरबंद: १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

भरदिवसा स्कार्पिओ कारसह १२ लाखांची रोकड लुटून चालकाचे अपहरण

पुढारी वृत्तसेवा

Buldhana Police Arrest Interstate Gang

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भरदिवसा स्कार्पिओ कारसह १२ लाखांची रोकड लुटून चालकाचे अपहरण करणाऱ्या आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. या कारवाईत आठ आरोपींना अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले असून ही मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी अभयसिंह आनंदसिंह वाघेला (रा. बनासकाठा, गुजरात) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी ते नागपूरहून गुजरातकडे स्कार्पिओ (एमएच ०१ ईजे ३७६८)ने १२ लाखांची रोकड घेऊन निघाले होते. सकाळी सुमारे १०.४५ वाजता दुसरबीड टोलनाक्याजवळ गाडीची हवा तपासत असताना बोलेरो व इनोव्हा वाहनातून आलेल्या १० ते १२ अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करून बंदुकीच्या धाकावर त्यांना त्यांच्या वाहनात जबरदस्तीने बसवून रोकडसह पळवून नेले आणि नंतर जालना जिल्हातील जंगलात सोडून दिले.

या घटनेनंतर किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात सापळा रचत आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपींची नांवे- हिम्मत सिंग कुंदन सिंग (वय २८, रा .अंबाजोगाई, जि.बीड), मनोज सर्जेराव कुटे (वय ३३, रा.साखरे बोरगांव) , मुन्ना केशवकुमार वर्मा (वय ३०, रा.पंचकुआ जि.खिरी (उ.प्र.), सचिन बुध्दाजी शिर्के (वय ४०, शिरवली जि.रायगड), हरीष तोमर देवळीकर (वय ४४, बजकोली उडपी कर्नाटक), जसपाल सिंग केसरसिंग झाला (वय २५, दरबारमढ, गुजरात), अरूण कुमार राय, नरेश यादव (वय २८), अंजनी महेशगंज (उ.प्र.), हो.रशिद नुरदिन गुज्जर (वय १९, ढोलकी, जि.पुंछ, जम्मू काश्मीर) अशी आहेत.

त्यांच्या ताब्यातून १ लाख ८० हजार रुपये रोख, देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, बोलेरो व इनोव्हा कार, मोबाईल फोन आणि वायफाय डिव्हाइस असा एकूण १२ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीतील आणखी दोन आरोपी फरार असून उर्वरित १० लाख २० हजारांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर, पीएसआय प्रताप बाजड, दीपक लेकुरवाळे, शेख चांद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे आणि मनोज खुरडे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT