आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. व आंदोलन मोडीत काढले  Pudhari
बुलढाणा

Buldhana Protest : पुस्तकाचे वाचन करणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; आमदार संजय गायकवाडांच्या कार्यालयाजवळ तणाव

Sanjay Gaikwad | आमदार गायकवाड यांच्या निषेधार्थ फलक हाती घेऊन निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

MLA Sanjay Gaikwad's office agitation

बुलढाणा: 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे वाचन करण्यासाठी बुलढाण्यात आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. व आंदोलन मोडीत काढले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा व पुस्तक वाचन होणार होते. परंतु, ऐनवेळी रोहित पवारांनी बुलढाणा दौरा रद्द केला.

आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर 'शिवाजी कोण होता? 'पुस्तकाचे वाचन करण्याचा बेत होता. परंतू बुलढाण्यात सकाळी पोहचल्यावर त्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गायकवाड यांच्या घरापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या जिजामाता प्रेक्षागार मैदानावर राज्याच्या विविध भागातून विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले अंदाजे दोनशे आंदोलक जमले होते.

त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विषयीचे फलक हाती घेऊन निदर्शने केली. व मैदानावरच पुस्तक वाचण्यास सुरुवात करणार इतक्यात अपर पोलीस अधीक्षक श्रौणिक लोढा, उपअधीक्षक सुधीर पाटील आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी वाहने व फौज फाट्यांसह आंदोलन स्थळी आले. आम्ही शांततेत पुस्तक वाचन करुन नियमांचे पालन करु, असे सांगू पाहणा-या आंदोलनकर्त्यांचे काहीएक ऐकायला पोलीस अधिकारी तयार नव्हते.

आंदोलकांमध्ये महिला व तरूणीही मोठ्या संख्येने होत्या.उल्लेखनीय म्हणजे आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप टाकलेला होता तो मंडप व पिण्याच्या पाण्याच्या कॅन्स मंडप ठेकेदाराने कुणाच्या तरी दबावामुळे आधीच काढून नेले होते. त्यामुळे ४३ अंश तापमानात आंदोलकांचे हाल झाले. त्यांना सावली व पाणी न मिळू देण्याचा अमानुषपणाही दिसून आला.

त्यातच कहर म्हणजे पोलिस अधिका-यांची दडपशाही दिसून आली.पोलिसांनी बळाचा वापर केला आणि 'शिवाजी कोण होता?'पुस्तकाचे वाचून सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलन दडपले. तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांचे समर्थकही मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यालयाजवळ जमले होते. प्रचंड तणावाची स्थिती शहराने अनुभवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT