

कोल्हापूर : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आ. संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि. 28) बुलडाण्यातील त्यांच्या घरावर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते महामोर्चा काढणार आहेत. यासाठी कोल्हापुरातून भाकप व इतर पक्षांचे सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले आहेत.
आ. गायकवाड यांनी आंबी यांना फोनवरून धमकी दिली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. पुरोगामी चळवळीने त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी त्यांची फसवणूक केली. याचा निषेध करण्यात आला. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक येथून शिवरायांना अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते बुलडाण्यास रवाना झाले.