अमरावती विभागीय आयुक्त डॉ.श्वेता सिंघल यांनी लोणार सरोवराची पाहणी करून जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले Pudhari
बुलढाणा

Lonar Sarovar | लोणार सरोवराच्या पर्यटन विकासाला गती द्या : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Lonar Sarovar Development Plan | सरोवर परिसरात सुरू असलेली बांधकामे, पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा आयुक्तांकडून आढावा

पुढारी वृत्तसेवा

Lonar Lake Tourism Development

बुलढाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे जतन व संवर्धन करण्यासोबतच पर्यटन विकासाला गती देण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. आयुक्तांनी शनिवारी (दि.१४) लोणार येथे सरोवर परिसराची पाहणी केली.

या भेटीत त्यांनी लोणार विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांवर भर देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या समवेत त्यांनी सरोवराची पाहणी केली.

सरोवर परिसरात सुरू असलेली बांधकामे,पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा आयुक्तांनी आढावा घेतला. लोणार विकास आराखडा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.गायमुख धार पुन्हा धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन गोड्या पाण्याचा नियंत्रित उपसा करण्याचा प्रस्ताव, लोणारमधील प्राचीन मंदिरांना जोडून स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. या मागण्यांबाबत तांत्रिक बाबी तपासून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ.श्वेता सिंघल यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात विभागीय वन अधिकारी (वन्यजीव, अकोला) यशवंत नागुलकर, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नगराध्यक्षा मीराताई मापारी,मुख्याधिकारी बोबडे तसेच पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी व नगर परिषद अभियंता आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT