Buldhana News : शासकीय हमीभावाने मका खरेदी प्रक्रिया सुरू करा

राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
Buldhana News
देऊळगाव राजा ः तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

देऊळगाव राजा ः खुल्या बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा मोठ्या प्रमाणात घसरल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने मका खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करून शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू केली असून या प्रक्रियेसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापही मका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

Buldhana News
VBA protest : प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा निषेध

यंदा तालुक्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांकडे मका विकावा लागत आहे. सध्या खुल्या बाजारात मक्याला 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

खासगी व्यापारी कमी दराने मका खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन खरेदी प्रक्रिया सुरू केली नाही तर शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Buldhana News
Jalna News | स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान व्हावा : डागोर

ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, महेश देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती हरीश शेटे, गणेश बुरकूल, सरपंच संदीप म्हस्के, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, बबन डोके, शेख कदीर, शेषराव कोल्हे, संजय खरात, गजानन चेके, अशोक शेळके, धर्मराज खिल्लारे, बळीराम भागिले आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नाराजी पसरली

मी भावापेक्षा जवळपास हजार रुपयांनी कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून देऊळगाव राजा तालुक्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मका खरेदी सुरू करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news